१)पद्मासन
कृती -----
१)सर्वप्रथम पाय लांब करून बसावे
पद्म म्हणजे कमळ या आसनास कमलासन असेही म्हणतात
.यात दोन्ही पायाचे तळवे कामाळाच्या पाकाळ्या प्रमाणे दिसतात ,म्हणून याला पद्मासन
म्हणतात .हे आसन शुध्दता,समतोलपना आणि संतुलीतपानाचे प्रतिक आहे
कृती
१)प्रथम पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बासा
२)उजवा पाय वाकून डाव्या जांघूत ठेवा
३)डावा पाय वाकवून उजव्या जांघेवर ठेवा
४)डावा पाय सोडा व एक नंबरच्या स्थितीत या
५)उजवा पाय सोडा व पूर्व स्थितीत या
काळजी ----
संध्याचा दाह होत आसलेल्या व्यक्तींनी हे आसन
काळजीपूर्वक करावे.
फियदे
१)या आसनामुळे शरीरातील उर्जेचा प्रवाह समतोल
प्रमाणात राहण्यास उपयोगी होतो
२)या आसनामुळे पायातील सर्व रक्तवाहिन्या उत्तम
काम करतात
३)या आसनामुळे पायावर कसलाही वाईट परिणाम होत
असेल तर दूर होतो
४)जप,प्राणायाम ,धारण आणि समाधीसाठी या आसनाचा
उपयोग होतो
५)या आसनामुळे भूक वाढते
६)हे आसन महिलांना अत्यंत उपयुक्त आहे .
२)शशाकासन
कृती -----
१)सर्वप्रथम पाय लांब करून बसावे
२)यामध्ये पायाला निताम्बापासून मोडून मागच्या दिशेने न्यावे
३)यामध्ये दोन्ही हात पाठीमागे घ्यावेत .
४) डोके जमिनीला टेकवावे.
काळजी
सांध्यांचा दाह आसलेल्या रुग्णांनी हे आसन काळजीपूर्वक करावे
फायदे ----
१) या आसनामुळे पाचन क्रिया वाढते .
२) या आसनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते .
३)पायाचे सांधे, स्नायू सशक्त बनतात.
उपयुक्तता --------
कमी रक्तदाब ,पचानेद्रीयांचे रोग ,पाठदुखी,स्थूलपणा इ.
३)वज्रासन
वज्र म्हणजे हिरा.ध्यान करण्यापूर्वी वाज्रासनामध्ये बसतात. या आसनात पायाची
बैठक वज्राप्रमाणे पक्की व मजबूत असते. पायांची हि बैठक सहजगत्या हलु शकत नाही
.म्हणूनच या आसनास ‘वज्रासन’ असे म्हणतात.
कृती --------
१)पाय लांब करून बसावे .
२)या मध्ये पायाला नितामबापासून मोडून मागच्या दिशेने न्यावे .
३)पायाचे तळवे आकाशाकडे उन्मुख असावेत .
४)पायाचा उजवा अंगठा डाव्या पायावर ठेवून याच स्थितीत बसावे
५)नितंब आपसात मिळाले पाहिजेत
६)कंबरेच्या वरचा भाग ताठ राहिला पाहिजे
७)दोन्ही हात मांडीवर ठेवावेत .
काळजी ------
संध्याचा दाह होत असलेल्या रुग्णांनी हे आसन काळजीपूर्वक करावे
फायदे --------
१)अग्नीमाद्याला दूर करून पचनशक्ती वाढवते
२)कफाचे निवारण करण्यास उपयुक्त .
३)मानसिक निराशेला दूर करून उत्साही वाटते.
४) ताप,अग्निमाद्या,बद्धकोष्ठ या सारखे विकार होत नाहीत .
५)गुडघे, पाय ,चवडे व मंड्या वारंवार
दुखत असल्यास हे आसन उपयुक्त
६)जेवल्यानंतर हे आसन केल्यास अन्न पचनास मदत होते
७)जेवल्यानंतर करावयाचे एक मेव आसन
८) ध्यानासाठी उपयुक्त .
उपयुक्तता
कमी/उच्च
रक्तदाब ,पाचानेद्रियाचे रोग,पायोरीया आणि पोटाशुल ,दमा
४) सुप्त वज्रासन
या आसनाच्या अंतिम स्थितीत पाठ जमिनीला टेकलेली असते, तर पाय वज्रासनाप्रमाणे
दुमडलेले असतात.म्हणून याला ‘सुप्त वज्रासन’ असे म्हणतात.
कृती ------
१)प्रथम वज्रासानाच्या स्थितीत बसावे .
२)तळहत गुडघ्यावर ठेवावेत .
३)मागे-मागे वाकत कोपरांचा आधार घ्यावा .
४)हळूहळू खांदे,मान ,मस्तक जमिनीला टेकवावे .
५)हात पूर्ववत गुडघ्यावार ठेवावेत.
६)खाली वाकातांना श्वास सोडावा व वर येताना श्वास घ्यावा .
काळजी ------
मानेतील मान्क्यांचा अस्थीदाह असेल तर
हे आसन करू नये
ह्दयविकार असणाऱ्यांनी देखील हे आसन करू नये
फायदे ---------
१)हे आसन मलावरोध दूर करण्यासाठी उपयोगी आहे .
२)पायांचे सांधे व स्नायू सशक्त बनतात .
३)पाय,पोट ,छाती चा या आसनात व्यायाम होतो
४)हे आसन केल्याने पचनसंस्था कार्यक्षम राहण्यास मदत होते
५)वायुविकार ,बध्दकोष्ठता ,आजीर्ण , मुळव्याध या साठी हे आसन उपयुक्त आहे
६)पोटाचा खालचा ,बेंबीकडील भाग ताणाला जातो व किडानिवरही याचा चांगला परिणाम
होतो
उपयुक्तता -----
त्वचा रोग ,स्त्रीयांच्या मासिक पाळीसंबंधी तक्रारी ,घशाचे विकार ,स्थूलपणा
,क्षय ,दमा




0 comments:
Post a Comment