बहुविभाजन
अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल
वातावरणामाध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात.ज्या वेळी अपुरे अन्न
किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्या वेळी अमिबा छ्दामपद तयार
करत नाही आणि हालचाल थांबवतो .तो गोलाकार होतो आणि पेशी पटला भोवती कठीण ,सरंक्षक
कवच तयार करतो .अशा कवचबद्ध अमिबाला किवा कोणत्याही एकपेशीय सजीव ‘पुटी’ म्हणतात .
![]() |
| बहुविभाजन अमिबामध्ये |
पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक
केंद्रके तयार होतात .मग पेशिद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे-छोटे अमिबा
तयार होतात .प्रतिकूल परिस्थिती असेपर्यत ते पुटीमध्येच राहतात .अनुकूल परिस्थिती
असल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात .

0 comments:
Post a Comment